
डॉ. धनश्री लेले या एक प्रभावी वक्त्या, orator आणि लेखिका आहेत. एखाद्या विषयाबद्दल भारतीय पौराणिक कथा, अध्यात्म आणि वाङ्मय यांचा सखोल अभ्यास करून त्याची उकल गोष्टीवेल्हाळ पद्धतीने प्रेक्षकांसमोर मांडणं ही त्यांची खासियत !
आपण सण-उत्सवप्रिय ! एक वेगळंच चैतन्य सणासुदीच्या काळात इथेसुद्धा आपण यथाशक्ती अनुभवायचा प्रयत्न करतो. या सणांच्या माध्यमातून एक संस्कृती घडत असते आणि ही संस्कृती समाजाला संस्कारांच्या एका धाग्याने विणत राहते, एकत्र बांधून ठेवते. हे सण साजरे करण्यामागे संस्कृतीची नेमकी भूमिका कोणती ? ते साजरे करण्याची पद्धत काय आणि मुख्य म्हणजे बदलत्या काळात अन दुसऱ्या देशात यातला नेमका कोणता गाभा जतन करायला हवा याबद्दल ऐकूया धनश्री ताईंच्या मंत्रमुग्ध करणाऱ्या वाणीतून ...
Lecture Room LT12-X2.05
Photography and Videography are prohibited during the event.