BMMS Geneva Ganesh Utsav 2026

Poster Image

॥ श्री गणेशाय नमः ॥

सण-परंपरांचा अभिमान,
करू नात्यांचा सन्मान ॥
श्रीगणेशाचे स्वागत खास,
आला आला भाद्रपद मास ॥


Hello everyone 🙏 


As every year, the Geneva Chapter of Brihan Maharashtra Mandal, Switzerland (BMMS) is all set to welcome our beloved Lord Ganesha with devotion, joy, and enthusiasm! 🪔🌺

We warmly invite you to join us with your family and friends for Ganesh Utsav 2026 — a celebration made truly special by everyone’s participation.


📅 Date & Venue

Saturday, 19 September 2026

📍 École de Culture Générale Henry-Dunant
Av. Edmond-Vaucher 20
1203 Genève


🕉️ Programme Schedule

Time
Programme
10:30 – 11:00                  Registration
11:00
Shri Ganesh Puja and Aarti
12:00 – 14:00
Festive Lunch (two batches)
14:00 – 16:00
Cultural Programme
16:00 – 17:00
Ganesh Procession and Visarjan
17:00 – 17:30
Community Clean-up


🍽️ Meal Registration

Advance registration is required for the event.

Please register meals for yourself and your family in advance so that we can make the necessary arrangements smoothly and avoid any last-minute inconvenience.

BMMS members will receive a CHF 10 coupon at the event to buy additional snacks available in the evening.


Menu
(Madhura Marche)

1. Traditional Thali — CHF 24
Puri, Shrikhand, Veg Kolhapuri, Matki Usal, Masala Rice, Mixed Pakora, Papad, Pickle, and a bottle of water

2. Sabudana Vada — CHF 12
2 Sabudana Vadas + Shrikhand

(Rekha - Varanasi Junction)

3. Samosa Chaat — CHF 16
Samosa Chaat + Chhena Payesh

4. Pav Bhaji — CHF 16
2 Pav + Bhaji + Chhena Payesh



🙏 Donations

There is no entry fee for this event.

Our Ganesh Utsav is made possible through the support and generous contributions of our community. If you wish to contribute, you can make a donation while registering on the Mandal website.

Every contribution helps us make this celebration even more joyful and memorable. ❤️


🎭 Cultural Programme

Talented artists from our community will present a variety of performances, adding even more colour and energy to the celebration. We encourage you to join us and support their talent.

Come and experience the joy of welcoming Ganpati Bappa, delicious Maharashtrian food, vibrant cultural performances, and wonderful moments with family and friends!


नमस्कार मंडळी 🙏

सालाबादप्रमाणे यंदाही भक्तिभावाने आणि उत्साहात आपल्या लाडक्या गणरायाचे स्वागत करण्यासाठी बृहन्महाराष्ट्र मंडळ, स्वित्झर्लंड – जिनिव्हा विभाग सज्ज झाला आहे! 🪔🌺

आपल्या सर्वांच्या सहभागाने साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सव २०२६ या आनंदसोहळ्यास आपण सहकुटुंब व मित्रपरिवारासह आवर्जून उपस्थित राहावे, ही आग्रहाची विनंती.


📅 स्थळ व दिनांक

शनिवार, १९ सप्टेंबर २०२६

📍 École de Culture Générale Henry-Dunant
Av. Edmond-Vaucher 20
1203 Genève


🕉️ कार्यक्रमाची रूपरेषा

वेळ
कार्यक्रम
१०:३० – ११:००            नोंदणी
११:००
श्री गणेश पूजाविधी व आरती
१२:०० – १४:००
सुग्रास भोजन (दोन बॅचेसमध्ये)
१४:०० – १६:००
सांस्कृतिक कार्यक्रम
१६:०० – १७:००
श्रींची मिरवणूक व विसर्जन
१७:०० – १७:३०
सामूहिक आवराआवर


🍽️ भोजन नोंदणी

कार्यक्रमासाठी पूर्वनोंदणी आवश्यक आहे.

आपण व आपल्या कुटुंबीयांसाठी भोजनाची नोंदणी आधीच करून ठेवावी, जेणेकरून आयोजन सुरळीत होईल आणि ऐनवेळी होणारी गैरसोय टाळता येईल.

कार्यक्रमामध्ये बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या सदस्यांना CHF 10 चे कूपन देण्यात येईल.


मेनू

(मधुरा मार्शे )

१. पारंपरिक थाळी — CHF 24
पुरी, श्रीखंड, व्हेज कोल्हापुरी, मटकी उसळ, मसाले भात, मिक्स भजी, पापड, लोणचं आणि पाण्याची बाटली

२. साबुदाणा वडा — CHF 12
२ साबुदाणा वडे + श्रीखंड

रेखा (वाराणसी जंक्शन)

३. समोसा चाट — CHF 16
२ समोसा चाट + छेना पायेश

४. पावभाजी — CHF 16
२ पाव + भाजी + छेना पायेश


🙏 देणगी

या कार्यक्रमासाठी मंडळाकडून कोणतेही प्रवेश शुल्क आकारले जाणार नाही.

आपला गणेशोत्सव हा आपल्या सर्वांच्या सहकार्याने आणि उदार देणग्यांमधून साकार होतो. आपण इच्छेनुसार देणगी मंडळाच्या वेबसाईटवर नोंदणी करताना देऊ शकता.

आपले प्रत्येक योगदान हा उत्सव अधिक सुंदर आणि संस्मरणीय बनवण्यासाठी मोलाचा हातभार आहे. ❤️


🎭 सांस्कृतिक कार्यक्रम

आपल्यातील गुणी कलाकार विविध कला सादर करून उत्सवाची रंगत वाढवणार आहेत. त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि या आनंदसोहळ्याचा मनमुराद आस्वाद घेण्यासाठी आपण आवर्जून उपस्थित राहा.

गणरायाच्या स्वागताचा आनंद, मराठमोळे सुग्रास भोजन, रंगतदार सांस्कृतिक कार्यक्रम आणि आप्तेष्टांच्या सहवासातील आनंददायी क्षण अनुभवण्यासाठी जरूर या!

चला तर मग, सर्वांनी मिळून म्हणूया —

गणपती बाप्पा मोरया! 🙏

मंगलमूर्ती मोरया! 🌺