Vyakhyan by Shri. Avinash Dharamadhkari

Poster Image

EBMM आणि ज्ञान प्रबोधिनी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एका विशेष कार्यक्रमासाठी आपले मनःपूर्वक स्वागत!


आपल्या सर्वांचे लाडके सर, मा. श्री. अविनाश धर्माधिकारी बे एरियामध्ये एका विशेष व्याख्यानासाठी येत आहेत. हा कार्यक्रम ज्ञान प्रबोधिनीच्या १९८७ च्या बॅचच्या सहकार्याने आणि EBMM च्या संयुक्त विद्यमाने विनामूल्य आयोजित करण्यात आला आहे.


सर सकाळी सिएटलहून बे एरियामध्ये येणार असून, त्याच संध्याकाळी बे एरियातून मुंबईकडे प्रस्थान करणार आहेत. या अत्यंत मर्यादित वेळेतही त्यांनी आपल्यासाठी "भारत, अमेरिका आणि विश्व" या नेहमी चर्चेत असणाऱ्या आणि आपल्याशी थेट निगडित अश्या विषयावर गप्पागोष्टींच्या स्वरूपात संवाद साधण्यास सहमती दर्शवली आहे.


त्यांच्या विचारांचा लाभ घेण्याची ही एक दुर्मिळ संधी आहे. आपण आपल्या कुटुंबीयांसह आणि मित्रपरिवारासह या विशेष कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहावे, ही नम्र विनंती.


⚠️ आसनसंख्या मर्यादित आहे. कृपया आपली उपस्थिती लवकरात लवकर RSVP करून निश्चित करा.


📅 दिनांक: रविवार, १६ ऑगस्ट २०२६

🕓 वेळ: सायं. ४:०० ते ५:१५ (PST)


📍 स्थळ:

Sri Satya Narayana Swamy Devasthanam

475 Los Coches Street, Hall# 489,

Milpitas, CA 95035


आपल्या उपस्थितीची आम्ही आतुरतेने वाट पाहत आहोत. धन्यवाद!