
संज्या छाया - एक विचार प्रवर्तक
पण हलकं फुलकं विनोदी नाटक.
हे एक संवेदनशील आणि उदबोधक नाटक आहे. पण ते अतिशय मार्मिक आणि धमाल पद्धतीने औरंगाबादच्या प्रशांत दळवी ह्यांनी मांडलंय. सख्ख्या नात्यांमध्ये एक दरी निर्माण होतेय की काय असं वाटत असतानाच त्या नात्यांची नाळ घट्ट करणारं हे मार्मिक नाटक आहे. सत्तरीत जयवंत दळवींनी लिहिलेलं "संध्या-छाया" हे खूप गाजलेलं नाटक. त्यात आपल्या मुलांशिवाय नाना-नानींना एकटेपण येऊन खूप वैषम्य वाटतं असा त्या नाटकाचा विषय होता. त्याच नाटकाचा धागा पुढे विणत लेखक प्रशांत दळवी आणि दिग्दर्शक सुहास गोसावी यांनी तो गंभीर विषय खुसखुशीत विनोदी पद्धतीने मांडलाय. आधी आपण मुलांचं सगळं करायचं आणि नंतर मुलांनी आपली सेवा करायची ह्या चाकोरीबद्ध विचारांना तडा देणारं हे नाटक. समवयस्क मित्र-मैत्रिणींची सोबतही आयुष्यात हिरवळ निर्माण करू शकते हा विचार खूप सोप्प्या पद्धतीनं मांडणारं हलकं फुलकं नाटक आहे हे. १२ वर्षा वरील मुलांना हे नाटक पहायला जरूर घेऊन या, त्यांना नक्की आवडेल.
लग्नबंबाळ नाटकानंतर कुसुम कला शिकागो हे नवीन नाट्य पुष्प घेऊन येत आहे. मनमुराद हसवणारं आणि सर्व पिढीतील लोकांना एक नवीन विचार देणारं नाटक "संज्या छाया".
For English Synopsis of the play click: https://tinyurl.com/44a28y87