नमस्कार,
महाराष्ट्र मंडळ बे एरियाच्या वतीने आपणांस महाराष्ट्र कला महोत्सव - ६ मध्ये मनःपूर्वक आमंत्रित करीत आहोत!
आपल्या संस्कृतीची समृद्ध परंपरा आणि विविध कलांची झलक साजरी करण्यासाठी आम्ही पुन्हा एकदा हा अनोखा महोत्सव घेऊन येत आहोत. मागील पाच महोत्सवांत २४ वेगवेगळ्या कार्यक्रमांतून ३०० हून अधिक कलाकारांनी आपल्या कलेची जादू रंगवली. त्या यशाची परंपरा पुढे नेत यावर्षीही आम्ही अनेक नवे प्रयोग, नवे कलाकार आणि नवी उंची घेऊन सज्ज आहोत.
📅 तारीख: १९ ते २१ सप्टेंबर २०२५
या तीन दिवसांच्या महोत्सवात आपणांसाठी ६ वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची मनमोहक मेजवानी असणार आहे – शास्त्रीय नृत्य, शास्त्रीय संगीत, विनोद, नाटक, संगीत नाटक अशा अनेक रंगांचा संगम!
आपल्या मंडळाचा नेहमीच प्रयत्न राहिला आहे की स्थानिक कलाकारांना व्यासपीठ मिळावे. हाच ध्यास घेऊन आम्ही दरवर्षी नवे कलाकार, नवे प्रयोग आपल्या समोर आणत आहोत. यंदाही अनेक उत्साही कलाकारांच्या सहभागामुळे हा महोत्सव संस्मरणीय ठरणार आहे.
आपली उपस्थिती या महोत्सवाला अधिक उजाळा देईल. चला तर मग, आपल्या कुटुंबीयांसह, मित्रमंडळींसह या महाराष्ट्र कला महोत्सव - ६ मध्ये सहभागी व्हा आणि कलांच्या या अविस्मरणीय सोहळ्याचा आनंद घ्या.
आपल्या भेटीची आतुरतेने वाट पाहत आहोत!
आदरपूर्वक,
महाराष्ट्र मंडळ बे एरिया
**Tickets & Food** Note: Except Friday, food is not included for anyone including Gold Members. You can purchase tickets for food for Saturday & Sunday (Lunch and Dinner separately) |