मकर संक्रांत २०२६ - (Makar Sankrant 2026)

Poster Image

मराठी मनाच्या गाभ्यात जिथे हसू आणि हळवा ठेवा एकत्र नांदतो तिथे पु. ल. देशपांडे कायम असतात.
शब्दांच्या मिश्किल वळणातून ते आपल्याला हसवतात, आणि त्याच हसण्यातून विचारांची हलकीशी चुटकी देऊन जातात.
पु. ल. म्हणजे आपल्या जगण्यावरची प्रेमळ टिप्पणी, कधी उपहास, कधी आपुलकी, कधी निव्वळ “आपलं”पण.


या मकर संक्रांतीला MMBA घेऊन येत आहे “पु. ल. देशपांडे” थीमवर आधारित खास कार्यक्रम "पु.ल. आणि आम्ही " जो आपल्याला पुन्हा एकदा पु. ल. यांच्या शब्दविश्वाशी, त्यांच्या विनोदाशी, आणि त्या काळाच्या मराठी संस्कृतीशी जोडेल.

कार्यक्रमात पु. लं च्या  विश्वात घेऊन जाणारे अनेक रंग असतील; कधी संगीताच्या सुरांतून, कधी नाट्यप्रवेशातून, कधी अभिवाचनातून, तर कधी बहुरूपी सादरीकरणातून. 

सोबतच दरवर्षीप्रमाणे हळदीकुंकू आणि आपल्या सर्वांसाठी खास वाण… म्हणजे संक्रांत पूर्णच! गोड तिळगुळ, खुमासदार पु. ल… आणि आपल्या माणसांची साथ, संक्रांत अशीच साजरी व्हायला हवी! 🙏😊