गुढी पाडवा - २०२४

Poster Image

तेलगू लोकांचा उगादी, सिंधी लोकांचा चेत्री चंद्र, काश्मिरी हिंदूंचा नवरेह आणि आपल्या मराठी लोकांचा गुढी पाडवा. चैत्र शुद्ध प्रतिपदा.. नव वर्षाची सुरुवात. साडे  तीन मुहूर्तांपैकी एक. गुढी पाडवा म्हणजे  काठीवर उभारलेली गुढी, कडू निंबाची पाने, जेवणात हटकून श्रीखंड आणि 'नीट बस गाढवा' ही यमक जुळवलेली चिडवा-चिडवी. महाराष्ट्रभर उत्साहाने साजरा केला जाणारा सण. 


आपण क्लीवलँडवासी ह्या वर्षी गुढी पाडवा २० एप्रिलला साजरा करणार आहोत. भरगच्च कार्यक्रम आहे 


•⁠  ⁠मोठ्या मुलांकरवी गुढी उभारणी 

•⁠  ⁠गुढी पूजन 

•⁠  ⁠महाराष्ट्रीय पद्धतीचे जेवण आणि तेही पंगत करून (आग्रहासहित). पंगतीत खड्या आवाजात श्लोक म्हणणाऱ्यास छोटेसे पारितोषिक देण्यात येईल 😊

•⁠  ⁠वीर सेनानी हा अभिनव कार्यक्रम भारतातील स्वातंत्र्य वीरांची शौर्य गाथा इंग्रजी, हिन्दी आणि मराठी आशा तिन्ही भाषांमध्ये संगीतमय रित्या प्रस्तुत करणार आहे. ही कथा तुम्हाला Indo-American जीवनातील आजच्या वास्तविकतेतून भारतातील स्वातंत्र्यपूर्व काळापर्यंत घेऊन जाते आणि एक रोमांचक अनुभव देऊन परत येते.अमेरिकेत राहणाऱ्या तरुण पिढीसाठी एक आगळा वेगळा अनुभव देणारा हा कार्यक्रम मुलांना आणि मोठ्यांना नक्की आवडेल.