Sankarshan Via Spruha संकर्षण व्हाया स्पृहा

Poster Image

अभिनेत्री स्पृहा जोशी आणि अभिनेता संकर्षण कऱ्हाडे यांचा ‘संकर्षण व्हाया स्पृहा’ हा कार्यक्रम अल्पावधीतच प्रसिद्ध झाला आहे. हा कार्यक्रम त्यांच्या अनोख्या शैलीतील कवितांसाठी प्रसिद्ध आहेत. या कार्यक्रमाचे आजवर महाराष्ट्र आणि इतर देशांत हाऊसफुल्ल प्रयोग सादर झाले आहेत. प्रेक्षकांकडून या कार्यक्रमाचं वेळोवेळी कौतुक झालं आहे. तुम्हालाही संकर्षण आणि स्पृहाच्या या कार्यक्रमाचा आनंद लुटायचा आहे?

कार्यक्रम कवितांपुरता मर्यादित नाही तर तो आठवणींचा आहे, गप्पांचा आहे आणि गाण्यांचाही आहे.
संकर्षण आणि स्पृहाच्या निवडक पण चोखंदळ कविता , मनाला भिडणारे किस्से, दैनंदिन जीवनात घडणारे साधे पण गमतीशीर प्रसंग…आपल्याला कधी हसवतात, कधी अंतर्मुख करतात तर कधी भावनिक ही करतात.