Geet Ramayan
गीत रामायण: काव्य नव्हे हा अमृत संचय
आदिकवी महर्षी वाल्मिकी यांनी रचलेले प्रभू रामचंद्रांचे चरित्र मराठी भाषेत गेय स्वरूपात आणण्याचे महान कार्य महाराष्ट्र वाल्मिकी गजानन दिगंबर माडगूळकर (गदिमा) आणि स्वरतीर्थ सुधीर फडके (बाबूजी) यांनी केलं. गदिमांनी रचलेल्या शब्दरूपी मोत्यांची बाबूजींनी स्वरांच्या सुवर्णसाखळीत केलेली गुंफण म्हणजे गीत रामायण
ही अजरामर कलाकृती.
गीत रामायणाच्या निर्मितीला आता ६९ वर्षे झाली. पण त्याची गोडी तर विटली नाहीच पण ती अधिकाधिक वाढत आहे.
गदिमांच्या शब्दातच सांगायचे झाले तर
*जोवरी हे जग जोवरी भाषण
तोवरी नूतन नित रामायण आणि गीत रामायण* 🙏
असा हा अमृत संचय आपल्यासमोर सादर करणार आहेत
माननीय श्रीधर फडके