SMM Manik Moti - माणिक मोती

हिंदुस्थानी शास्त्रीय आणि सुगम संगीतपरंपरेच्या मुकुटावरील अनमोल “माणिक” म्हणजे माणिक वर्मा.
आपले सिॲटल् मधील गुणी गायक व वादक कलाकार घेऊन येत आहेत , पद्मश्री माणिक वर्मायांच्या अजरामर भक्तिसंगीत, भावगीत, अभंग,ठुमरी लावणी, गझल, नाट्यपदांच्या मोत्यांचा नजराणा - “माणिक मोती” - घननिळा लडिवाळा, जाळीमंदी पिकली करवंद, त्या सावळ्यातनुचे, विजय पताका श्रीरामाची अश्याअनेक टपोऱ्या पाणीदार मोत्यांना एकत्रमाळेत गुंफलं तर तुम्ही अर्थातच म्हणाल, “माणिक मोती”.