Swarali

Poster Image

सिॲटल् महाराष्ट्र मंडळ प्रस्तुत आणि सिॲटल् मधील नावाजलेला 'स्वराली' वाद्यवृंद, तब्बल ८ वर्षांच्या अवधीनंतर, पुन्हा एकदा घेऊन येत आहेत, ३ तासांचा, केवळ मराठी गीतांचा संगीत-आविष्कार - स्वराली २०२४! 

कीबोर्ड, गिटार, ड्रम्स, कॉंगास, तबला, ढोलकी अश्या अनेक वाद्यांना साज चढवणारे वादक, संपूर्ण अमेरिकेत प्रसिद्ध असलेले अत्यंत सुरेल गायक आणि त्यांना तोडीची साथ देणारे बाल-गायक! जुन्या मराठी चित्रपट गीतांपासून ते आधुनिक मराठी रॉक सॉंग्स पर्यंत, सर्वांच्या आवडीची गाणी असणारा हा बहारदार कार्यक्रम आवर्जून अनुभवा! 

तारीख आणि वेळ: एप्रिल २७, संध्याकाळी ५:०० वाजता (प्रवेशदार उघडण्याची वेळ: ४:३० वाजता याची कृपया नोंद घ्यावी)